कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील २ बंदीवानांचे कारागृह अधीक्षकावर आक्रमण !

कारागृह आणि शिक्षेचाही धाक न राहिलेले गुन्हेगार !

ठाणे, १५ सप्टेंबर (वार्ता.) – कल्याणच्या आधारवाडी कारागृहात बराकीची पडताळणी करण्यासाठी गेलेल्या तुरुंग अधीक्षक आनंद पानसरे आणि त्यांचे साहाय्यक पोलीस शिपाई भाऊसाहेब गंजवे यांच्यावर २ बंदीवानांनी टोकदार वस्तूने आक्रमण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. दोन्ही बंदीवान गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत होते. तुरुंग अधीक्षक आनंद पानसरे यांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, तर पोलीस शिपाई भाऊसाहेब गंजवे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात महम्मद अल्ताफ उपाख्य आफताब खालिद आणि दिलखुश उपाख्य अंकित महेंद्र प्रसाद या २ आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.