१. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना साधकांनी ‘सद्गुरु दादा’ असे संबोधणे
‘सर्वसाधारणपणे संस्कारी कुटुंबांत वयस्कर व्यक्तींना आदराने आणि प्रेमाने ‘तात्या’, ‘दादा’, ‘भाऊसाहेब’, ‘काका’, ‘पंत’ इत्यादी’ नावांनी संबोधले जाते. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना साधक ‘सद्गुरु दादा’ असे संबोधतात. ‘दादा’ हे संबोधन त्यांच्यासाठी किती योग्य आहे’, हे त्यांच्या ठायी असलेल्या गुणवैशिष्ट्यांवरून लक्षात येते. यातील ‘दादा’ या शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.
१ अ. ‘दादा’ या शब्दातील पहिला ‘दा’ म्हणजे ‘दायित्व घेणे’ : ‘दादा’ या शब्दातील पहिला ‘दा’ म्हणजे दायित्व ! सद्गुरु दादा साधकांना कसे सांभाळून घेतात, ते पुष्कळ लक्षणीय आहे, उदा. साधकांची आस्थेने विचारपूस करणे, प्रीतीने सर्वांशी जवळीक साधणे, साधना आणि सेवा यांसाठी साधकांना प्रोत्साहन देणे. ते स्वतः आश्रमातील कार्यपद्धतींचे काटेकोरपणे पालन करून साधकांना त्याप्रमाणे अनुसरण करण्यास दिशादर्शन करतात.
१ आ. ‘दादा’ या शब्दातील दुसरा ‘दा’ म्हणजे अध्यात्मज्ञानाचे दान देणे : ‘दादा’ या शब्दातील दुसरा ‘दा’ म्हणजे दान देणे. सद्गुरु राजेंद्रदादांजवळ अध्यात्मज्ञानाचे उपजत भांडार आहे. तेे साधकांना सत्संगातून आणि वैयक्तिक भेटीतून नेहमी ज्ञान प्रदान करत असतात. ‘त्या ज्ञानाचा साधकांना लाभ कसा होईल ?’, याचे चिंतन त्यांच्या मनात सतत चालू असते. ‘साधकांचा आध्यात्मिक उत्कर्ष कसा होईल’, यासाठी त्यांची जी निरंतर धडपड असते, ती अवर्णनीय आहे.
‘यातून सद्गुरु राजेंद्रदादांसाठी ‘सद्गुरु दादा’ हे संबोधन किती योग्य आहे’, हे प्रत्ययाला येते.
२. सद्गुरु राजेंद्रदादा साधकांंचे ‘आवडते दादा’ असणे
साधक सद्गुरु दादांना पहाताक्षणी त्यांना आदराने नमस्कार करतात. ते साधकांंचे आणि इतरांचे ‘आवडते दादा’ आहेत. त्यामुळे म्हणावेसे वाटते, ‘असे आमुचे लाडके सद्गुरु राजेंद्रदादा !’
३. काही वेळा सद्गुरु राजेंद्रदादा आश्रमात वावरत असतांना ‘परात्पर गुरुमाऊलीच साधकांची आस्थेने विचारपूस करत आहे’, असे वाटते.’
– श्री. कृष्णकुमार जामदार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.३.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |