चीन तालिबानला साहाय्य म्हणून २२८ कोटी रुपये देणार !

कोरोनाच्या ३० लाख लसी दान देणार !

  • लोकशाहीच्या विरोधात जाऊन सत्ता स्थापन करणार्‍या तालिबानला चीनने साहाय्य केले असल्याने लोकशाहीचा पुरस्कार करणारी पाश्‍चात्त्य राष्ट्रे आता चीनच्या विरोधात ठोस भूमिका घेतील का ? – संपादक
  • अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यामुळे चीनला डोकेदुखी ठरलेले आणि अफगाणिस्तानच्या भूमीला लागून असलेल्या चीनच्या शिनजियांग प्रांतातील उघूर मुसलमान डोके वर काढू शकतात. तसेच अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात खनिज साठा आहे. हे ओळखूनच चीनने तालिबानला साहाय्य केले आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • लस ही इस्लाममध्ये ‘हराम’ असतांना तालिबानला कोरोनाच्या लसी चालणार आहेत का ? – संपादक

बीजिंग (चीन) – अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर ७ सप्टेंबर या दिवशी तालिबान्यांनी त्यांच्या सरकारची घोषणा केली. या सत्ता स्थापनेवर जागतिक स्तरावरून कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसली, तरी चीनने नवीन तालिबान सरकारसाठी ३१० लाख अमेरिकी डॉलर्सच्या (२२८ कोटी भारतीय रुपयांहून अधिकच्या) साहाय्याची घोषणा केली आहे.

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी यासंदर्भात माहिती दिली. चीन आर्थिक साहाय्यासह तालिबान सरकारला अन्नधान्य, औषधे, कोरोनाच्या लसी, कपडे यांचेही मोठ्या प्रमाणावर साहाय्य करणार असल्याचे सांगितले जात आहे. चीन अफगाणिस्तानला ३० लाख कोरोनाच्या लसी दान म्हणून देणार आहे.