जम्मू-काश्मीरमध्ये २०० आतंकवादी घातपात करण्याच्या सिद्धतेत !

आय.एस्.आय.चे षड्यंत्र !

पाकला नष्ट केल्याविना जम्मू-काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही ! – संपादक

नवी देहली – अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आणण्यामध्ये पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चा मोलाचा वाटा आहे. आय.एस्.आय.च्या साहाय्यामुळेच तालिबानला अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवता आले. आता आय.एस्.आय.ने लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आणि अल्-बद्र या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यास पाठवले आहे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास २०० जिहादी आतंकवादी सक्रीय आहेत. यामध्ये परदेशी आणि स्थानिक आतंकवादी यांचा समावेश आहे. आय.एस्.आय.कडून आदेश मिळताच ते घातपात घडवू शकतात. आय.एस्.आय.च्या या षड्यंत्राच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. त्यांनी सीमेवर बंदोबस्त वाढवला आहे.