‘६० टक्के आणि त्यापुढील पातळी साध्य झालेल्या साधकांच्या गुणवैशिष्ट्यांचे लिखाण केवळ न वाचता ‘त्यात दिलेली गुणवैशिष्ट्ये स्वतःत आहेत का ?’, याचा अभ्यास करावा आणि स्वतःमध्ये नसतील, ती गुणवैशिष्ट्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. असे केले, तरच गुणवैशिष्ट्ये छापण्याचे सार्थक होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. सेवेसाठी आवश्यक गुण असणे
‘श्री. शरद भंगाळेकाकांमध्ये ‘व्यवस्थितपणा, वेळेचे पालन करणे, सुनियोजन, प्रामाणिकपणा, निर्णयक्षमता, उत्तम स्मरणशक्ती, निरनिराळ्या विषयांचा अभ्यास, वाचनाची आवड, अभ्यासू वृत्ती’ इत्यादी सेवेसाठी आवश्यक असे गुण आहेत.
२. ते जेवणात दिलेले पदार्थ आवडीने खातात. त्यांना आवड-नावड नसते.
३. परिस्थिती स्वीकारणे
ते वर्तमानात राहून अडचणींवर सहज मात करतात. ते आलेली परिस्थिती सहजपणे स्वीकारतात. तसेच ते भावनेत अडकत नाहीत.
४. ‘प्रत्येक व्यक्ती सक्षम आणि चांगला नागरिक कसा घडेल ?’, याविषयी ते मार्गदर्शन करतात.’
– सौ. रत्ना भंगाळे (पत्नी), मिरज
५. सर्वांशी जवळीक साधणे
‘काकांना ‘आपल्या कुटुंबातील सर्वांनी साधना करावी’, अशी तळमळ असते. सेवा करता करता ते ‘सामाजिक, अध्यात्म, आयुर्वेद, औषधी वनस्पती, व्यायाम’, अशा सर्व विषयांवर चर्चा करत सर्वांशी आनंदाने जवळीक साधतात. मनात कोणताही किंतु न ठेवता प्रांजळपणे स्वतःविषयीही बोलतात. सेवेतील सर्व साधकांशी त्यांच्या वैयक्तिक अडचणी किंवा साधना यांविषयी आपुलकीने बोलून ते सगळ्यांचे मन मोकळे करतात.
६. सेवेची तळमळ
६ अ. काकांकडून कोणतीही सेवा परिपूर्ण होण्याची निश्चिती असणे : ‘काकांमध्ये ‘प्रांजळपणा, मनमोकळेपणा, तत्परता, स्वयंशिस्त, परिपूर्ण आणि अचूक सेवा करणे, इतरांना साहाय्य करणे, आज्ञापालन, दिसेल ते कर्तव्य आणि सहजता’, हे गुण आहेत. दायित्वाने सेवा करून ती श्री गुरुचरणी अर्पण करण्याचा त्यांचा भाव असल्याने त्यांच्याकडून कोणतीही सेवा पूर्ण होण्याची निश्चिती असते.
६ आ. काका पूर्वी नोकरी करत असतांना ‘त्यातून वेळ काढून कधी सेवेसाठी जाऊ ?’, अशी ओढ असे.
६ इ. त्यांना परगावी जायचे असल्यास सेवेला प्रथम प्राधान्य देऊन त्यानुसार ते आपले नियोजन करतात.
६ ई. एकदा ‘रात्रीच्या वेळी एक सेवा करायला येऊ शकता का ?’, असे विचारल्यावर ते त्यांच्या मुलाला, म्हणजेच पुष्करला घेऊन लगेच आले.
६ उ. काकांना पक्षाघाताचा त्रास झाला, तरीही त्यांनी त्यावर मात करून काही कालावधीनंतर ज्या सेवा घरून करता येतील, अशा सेवा त्यांनी आरंभल्या. उजव्या हाताला त्रास असूनही हळूहळू ते सर्व सेवा करू लागले.
७. सेवेसाठी साहाय्याला कुणी नसेल, तर काकांना न सांगताही ते पुढील सेवेविषयी विचारपूस करून त्याप्रमाणे स्वतः वेळ काढून साधकांना साहाय्य करतात.
८. इतरांना सेवा शिकवून सिद्ध करणे
एकदा काका १ मास पुण्याला त्यांच्या मुलीकडे गेले. तेव्हा त्यांच्याशेजारी रहाणार्या साधिकांनी काका करत असलेली सेवा पूर्ण केली. यावरून ‘काका सेवा घरी घेऊन जात होते. त्या वेळी त्यांनी ते करत असलेल्या सर्व सेवा घरातील आणि शेजारील साधकांना शिकवल्या होत्या’, हे लक्षात आले.
९. इतरांना आधार वाटणे
ते विविध सेवा तत्परतेने, अचूक, वेळेत आणि शिस्तबद्धतेने करत असल्याने काकांचा सर्वांना आदर आणि आधारही वाटतो.’
– कु. माधवी आचार्य, सनातन आश्रम, मिरज.
१०. जाणवलेला पालट
‘त्यांची त्वचा मऊ झाली आहे. त्यांच्या गालांवर गुलाबी छटा दिसते.’ – सौ. रत्ना भंगाळे (पत्नी), मिरज
(२५.८.२०२०)