पंजशीरवर तालिबानचे नियंत्रण नाही ! – नॉर्दन अलायन्स

काबुल (अफगाणिस्तान) – तालिबानने अफगाणिस्तानच्या पंजशीर प्रांतावर नियंत्रण मिळवल्याचा दावा तालिबानकडून केला जात आहे, तर पंजशीरवर नियंत्रण असलेल्या नॉर्दन अलायन्सने हा दावा खोडून काढला आहे; मात्र पंजशीरवर नियंत्रण मिळवल्याच्या आनंदामध्ये तालिबानी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये दोन लहान मुलांचा मृत्यू, तर काही जण घायाळ झाल्याचे वृत्त स्थानिक ‘असवाका’ वृत्तसंस्थेने दिले आहे.