‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाच्या विरोधात जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

नाशिक येथील निवासी उपजिल्हाधिकारी निवेदन स्वीकारतांना

जळगाव, ३ सप्टेंबर (वार्ता.) – ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाचे जागतिक स्तरावर आयोजन करण्यात आले आहे. या विरोधात जळगाव, धुळे, नंदुरबार येथील जिल्हाधिकारी, तसेच यावल, भुसावळ, पारोळा, धरणगाव आणि एरंडोल येथील तहसील कार्यालयांत अन् फैजपूर प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले. यात हिंदु राष्ट्र सेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षा सेना यांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते यांचा सहभाग होता. जळगाव येथील प्रसिद्ध ज्येष्ठ विधीज्ञ सुशील अत्रे आणि उद्योजक श्री. उमेश सोनार यांनी त्यांची प्रतिक्रिया देत हिंदुविरोधी परिषदेचा निषेध केला.

नाशिक येथील निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नाशिक जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गौरव जमधाडे आणि श्री. राहुल पाटील उपस्थित होते.