‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स’चे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीचे सांगली, ईश्वरपूर आणि पलूस येथे निवेदन

पलूस येथे तहसीलदार निवास ढाणे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

सांगली, ३ सप्टेंबर (वार्ता.) – ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स’चे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली, ईश्वरपूर आणि पलूस येथे निवेदन देण्यात आले. सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सचिन पवार आणि श्री. कृष्णा यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई अन् श्री. नारायण मेणकर उपस्थित होते.

पलूस येथे तहसीलदार निवास ढाणे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री विजय पाटील, सत्यजित पाटील, शरद पाटील, हिंदु जनजागृती समितीचे भीमराव खोत आणि श्री. शशिकांत जोशी उपस्थित होते. ईश्वरपूर येथे नायब तहसीलदार सीमा सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. गौरव चौगुले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष कुंभार उपस्थित होते.