|

अमरावती (आंध्रप्रदेश) – ऑल इंडिया ट्रू क्रिश्चियन कौन्सिलच्या वतीने आम्ही मागणी करतो की, भारताची २ भागांमध्ये फाळणी करून ख्रिस्त्यांना अर्धा भाग म्हणून वेगळा देश दिला पाहिजे. फाळणी केल्यानंतर आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही, असे फुटिरतावादी विधान ‘बायबल ओपन यूनिव्हर्सिटी इंटरनॅशनल’चे उप संचालक पाद्री उपेंद्र राव यांनी केले आहे. (‘बाटगे ख्रिस्ती हे पोपपेक्षाही कडवे असतात’, असे म्हटले जाते. त्याचे हे उदाहरण होय ! ‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’ असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते. त्याचीच प्रचीती येथे मिळत आहे ! – संपादक) याविषयीचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ ‘एस्.सी/एस्.टी राइट्स फोरम’ने (‘अनुसूचित जाती-जमाती हक्क मंचा’ने) त्याच्या ट्विटर खात्यावरून शेअर केला आहे. (भारतात अनुसूचीत जाती-जमातीच्या हिंदूंना ख्रिस्ती धर्मप्रचारकांकडून विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. या समाजाच्या उत्कर्षाच्या नावाखाली ‘एस्.सी/एस्.टी राइट्स फोरम’ सारख्या संघटना कसल्या कारवाया करतात, याकडे सरकारी यंत्रणांनी लक्ष ठेवणे आवश्यक ! – संपादक) पाद्री उपेंद्र राव तेलंगाणा आणि महाराष्ट्र येथील ‘अखिल भारतीय खरे ख्रिस्ती परिषदे’चे राज्य अध्यक्षही आहेत.
“Under the leadership of our beloved leader Mr PD Sundara Rao, we, on behalf of All India True Christian Council demand that India should be split into 2 and 1 half given to Christians as a separate country. We’ll not bother you”:
-K Upendra, Bible Open University International pic.twitter.com/BzVHtGkbno— SC ST RIGHTS FORUM (@SCSTForum) August 24, 2021
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
Brihanmumbai Municipal Corporation : विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !