धर्मांधाचे ‘रोहन’ बनून हिंदु युवतीशी लग्न आणि धर्मांतर
आगर माळवा (मध्यप्रदेश) येथे लव्ह जिहाद !
-
मारहाण करून पीडितेच्या पाठीचे हाड तोडले
-
धर्मांधाने पीडितेचे २ लाख रुपये हडपले
देशभरात लक्षावधी हिंदु तरुणी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडूनही त्याविरोधात सरकारकडून कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नाही. यामुळेच धर्मांधांना अधिकच प्रोत्साहन मिळत असून प्रत्येक राज्यात लव्ह जिहादच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. लव्ह जिहादसारख्या घटना रोखण्यासह हिंदूंना सुसह्य जीवन जगता येण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही ! – संपादक

आगर माळवा (मध्यप्रदेश) – जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण समोर आले आहे. इरफान खान याने रोहन नाव सांगून हिंदु युवतीशी लग्न गेले. त्यानंतर बळजोरीने तिचे धर्मांतर केले. या काळात जबर मारहाण करून तिच्या पाठीचे हाड तोडले, तसेच तिच्याजवळील २ लाख रुपयेही हडपले. या प्रकरणी सुसनेर पोलीस ठाण्यामध्ये इरफानच्या विरोधात धर्मांतर, ॲट्रॉसिटी आणि मारहाण करणे या कलमांतर्गत प्रकरण नोंदवण्यात आले असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
इरफान खान याने ३ वर्षांपूर्वी शुजालपूर येथे रोहन नाव सांगून मेघवाल समाजाच्या २१ वर्षीय युवतीशी लग्न केले. पीडितेने सांगितले, ‘‘महाविद्यालयामध्ये असतांना माझी रोहन नावाच्या युवकाशी ओळख झाली होती. त्याने मला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. माझ्याकडे २ लाख रुपये होते, तेही त्याने लग्नानंतर हडप केले. फेब्रुवारी २०२१ मध्ये माझे बळजोरीने धर्मांतर करून दुसर्यांदा ‘निकाह’ करण्यात आला आणि माझे आलीया बी, असे नाव ठेवण्यात आले. मी धर्मांतराला विरोध केल्यामुळे त्याच्या कुटुंबाने मला जबर मारहाण केली. यात माझ्या पाठीचे हाड तुटले असून मला व्यवस्थित चालताही येत नाही.’’ पीडितेला २ मुले आहेत. १४ मार्च २०२१ या दिवशी इरफान पीडितेला घेऊन शुजालपूर येथून सुसनेर येथे रहावयास गेला. १९ ऑगस्ट या दिवशी पीडिता पळून जाऊन आईवडिलांकडे गेली आणि २४ ऑगस्ट या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ओडिशामध्ये धर्मांधाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याने हिंदु युवतीची आत्महत्या
- हिंदु युवती एका धर्मांधाच्या दुकानामध्ये केवळ चॉकलेट आणण्यासाठी गेली, तर तिला जीव गमवावा लागला. यावरून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी धर्मांधांशी व्यवहार करण्यास बंदी घालण्याची केलेली मागणी किती रास्त आहे, हे लक्षात येते ! – संपादक
- केवळ धर्मांधांना भाड्याने खोली दिली नाही; म्हणून कांगावा करणार्या वृत्तवाहिन्या या हिंदु युवतीच्या आत्महत्येची साधी बातमीही देणार नाही, हे लक्षात घ्या आणि अशा माध्यमांवर बहिष्कार घाला ! – संपादक

भुवनेश्वर (ओडिशा) – भद्रक जिल्ह्यातील नाथशाही गावामध्ये एका २० वर्षांच्या युवतीवर ६५ वर्षांच्या मुस्किन शेख याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने पोलिसात तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. काही दिवसांनी आरोपीला जामीन मिळाल्यानंतर त्याने पीडितेच्या कुटुंबाला धमक्या दिल्या. त्या धमक्यांचा दबाव सहन करू न शकल्याने पीडितेने आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपीला परत अटक करण्यात आली आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीप्रमाणे २० वर्षीय युवती बाजारात दोन मैत्रिणीसमवेत गेली होती. घरी परत येत असतांना पीडिता मुस्किन शेखच्या दुकानामध्ये चॉकलेट आणण्यासाठी गेली. तेव्हा त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पुष्कळ वेळ होऊनही पीडिता परत आली नाही; म्हणून तिच्या मैत्रिणींनी दुकानामध्ये जाऊन पाहिले. तेव्हा त्यांना मुस्किन शेख पीडितेवर बळजोरी करत असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी तिला मुस्किनच्या तावडीतून सोडवले.
या घटनेची माहिती पीडितेने कुटुंबियांना दिली. त्यानंतर कुटुंबियांनी पुराना बाजार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुस्किन शेखला अटक केली; परंतु काही दिवसांनी त्याला जामीन देण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबावर तक्रार मागे घेण्यास दबाव आणला, तसेच मुस्किन शेख आणि त्याच्या दोन्ही मुलांनी देखील पीडितेच्या कुटुंबाला धमक्या दिल्या. प्रतिदिन मिळणार्या धमक्यांचा दबाव सहन न झाल्याने ८ ऑगस्ट या दिवशी पीडितेने आत्महत्या केली. हे वृत्त पसरल्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला आणि पीडितेला न्याय देण्यासाठी मेणबत्ती मोर्चा काढला. (हिंदू अन्याय झाल्यावर मेणबत्ती मोर्चा काढतात, तर धर्मांध सरळ कायदा हातात घेतात. त्यामुळे धर्मांधांचा उद्दामपणा अधिक वाढत आहे. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हिंदूंनी स्वरक्षण घेणे आणि संघटित होणे आवश्यक आहे ! – संपादक)
मोतिहारी (बिहार) येथे धर्मांधांकडून युवतीवर सामूहिक बलात्कार
पीडितेच्या मैत्रिणीचे आरोपींना साहाय्य
सर्वपक्षीय शासनकर्ते धर्मांधांचे लांगूलचालन करत असल्यामुळे धर्मांध उन्मत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचा गुन्हेगारीमधील सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी धर्मांधांना फाशीची शिक्षा देणे आवश्यक आहे ! – संपादक

मोतिहारी (बिहार) – जिल्ह्यातील चकिया पोलीस ठाण्याच्या क्षेत्रामध्ये धर्मांधांनी एका १० वीच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यासाठी पीडितेच्या मैत्रिणीने आरोपींना सहकार्य केले. या प्रकरणी महंमद अर्शद, अर्शद अली आणि तबस्सूम खातून यांच्या विरोधात पोलिसांकडून प्रथमदर्शनी माहिती अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंदवण्यात आला आहे.
पीडितेच्या आईने सांगितल्याप्रमाणे १७ ऑगस्टच्या रात्री पीडिता तिच्या घरी झोपली असतांना रात्री ११ वाजता आरोपींनी तिचे अपहरण केले. त्यानंतर एका बागेमध्ये नेऊन सामूहिक बलात्कार केला. मुलीला शोधण्यासाठी पीडितेचे आईवडील बागेच्या दिशेने गेले असता आरोपी पळून गेले. ‘या कामासाठी पीडितेची मैत्रिण तबस्सूम खातून हिने पीडितेला आरोपींकडे सोपवले’, असा आरोप पीडितेच्या आईने केला. याला पीडितेने स्वत: दुजोरा दिला आहे. माध्यमांच्या माहितीप्रमाणे पीडितेला उचलून नेण्याच्या धमक्या धर्मांधांनी अनेक वेळा दिल्या होत्या.
धर्मांधांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन हिंदु मुलीची आत्महत्या
जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण
धर्मांध तरुणांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुली आत्महत्या करत आहेत. यावरून धर्मांधांनी त्यांचे जीवन किती असह्य केले असेल, हे लक्षात येते. या संकटाला सामोरे जाण्यासाठी आता हिंदु मुलींनी स्वरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे, तसेच हिंदूंनी कुटुंब आणि समाज यांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे ! – संपादक

जौनपूर (उत्तरप्रदेश) – येथे धर्मांध युवकांच्या छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन हिंदु मुलीने फाशी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी पीडितेने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीमध्ये ‘माझ्या मृत्यूसाठी रुस्तम अली उत्तरदायी असून त्याचा सूड घ्यावा’, असे वडिलांना सांगितले आहे. या प्रकरणी रुस्तम अली, त्याचे आजोबा अलीरजा आणि काका वारिफ उपाख्य गोरख यांच्या विरोधात प्रकरण नोंदवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे सुसेरी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणार्या कमरुद्दीनपूर येथे एका १५ वर्षीय हिंदु मुलीने २४ ऑगस्टच्या मध्यरात्री फाशी लावून आत्महत्या केली. सकाळी मुलीने तिच्या खोलीमध्ये फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे तिच्या आईला आढळून आले. या वेळी घटनास्थळी एक आत्महत्या पूर्व चिठ्ठी आढळून आली. त्यात तिच्या मृत्यूसाठी गावातील धर्मांध युवकांना उत्तरदायी ठरवले आहे. तिने लिहिले की, ‘‘पिताजी, माझ्या मृत्यूला रुस्तम अली कारणीभूत आहे. तुम्ही त्याचा नक्की सूड घ्या. त्याने माझ्याशी अतिशय वाईट वर्तन केले आहे आणि माझ्या मृत्यूला उत्तरदायीही तोच आहे.’’
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी