मनसेची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई – प्रशिक्षण चालू असतांना चुकीने एक बाण महापौरांच्या निवास परिसरात जाऊन पडल्यामुळे काही वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील धनुर्विद्येचे प्रशिक्षण मुंबई महानगरपालिकेकडून बंद करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पुन्हा चालू करण्यात यावे, यासाठी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
या पत्रात संदीप देशपांडे यांनी लिहिले आहे की, प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि त्याला साजेसे ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्हही घेतले. रामायण-महाभारत काळापासून धनुष्यबाण हे हिंदु धर्मातील महत्त्वाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे लवकरात लवकर धनुर्विद्येचे प्रशिक्षण चालू करा, अन्यथा पक्षचिन्हात पालट करा.’’