६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अमरावती येथील कु. संहिता विलोभ भारतीय (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. संहिता विलोभ भारतीय एक आहे !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रावण कृष्ण पक्ष तृतीया (२५.८.२०२१) या दिवशी कु. संहिता विलोभ भारतीय हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि चुलत आजी (आईची काकू) यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. संहिता भारतीय

कु. संहिता विलोभ भारतीय हिला सातव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. गरोदरपण

१ अ. सात्त्विकतेची ओढ निर्माण होणे

‘गरोदर असतांना माझ्यात नियमित नामस्मरण, धार्मिक ग्रंथांचे वाचन, भजने म्हणणे आणि ऐकणे यांची आवड निर्माण झाली अन् ते करण्यासाठी मला प्रेरणा मिळाली. मी प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकत असे. बाळाच्या जन्मानंतर बाळालाही भजनांची आवड असल्याचे लक्षात आले.

१ आ. वैद्यकीयदृष्ट्या अडचणी येऊनही त्रास न होणे

‘गर्भजल अल्प आहे आणि बाळाचे वजनही अल्प आहे’, असे आधुनिक वैद्यांनी मला सांगितले होते. आधुनिक वैद्यांनी मला बाळ खाली सरकत असल्याचे सांगितले. त्या वेळी मी आयुर्वेदीय औषधोपचार घेतल्यावर शेवटपर्यंत कुठलाही अडथळा आला नाही.

२. जन्म ते ६ मास

२ अ. बाळाचा जन्म झाल्यावर तिचे वजन २ किलो असूनही तिला अतीदक्षता विभागात ठेवावे लागले नाही. ‘बाळ माझ्याजवळच होते’, ही देवाचीच कृपा आहे.

२ आ. संहिता ३ मासांची असतांना तिला ‘ॐ’ म्हणता येऊ लागला. तो ऐकण्यास पुष्कळ मंजुळ वाटायचे.

२ इ. सात्त्विकतेची ओढ

१. मी बाळंतपणासाठी आईकडे गेले होते. बाळ सव्वा मासाचे असतांना फार रडत असे. बाळ रडत असतांना माझी काकू बाळाला पू. रत्नाकरकाका (अमरावती येथील सनातनचे संत पू. (कै.) रत्नाकर मराठे) रहात असलेल्या खोलीत घेऊन जायची. तेथे ती आपोआप शांत व्हायची.

२. ती ५ मासांची असल्यापासून आमचे देवदर्शनांना जाणे होत होते. तेव्हा तिला देवदर्शनाची विशेष ओढ असल्याचे माझ्या लक्षात आले. प्रवासाच्या वेळी तिने कधीही त्रास दिला नाही.

३. प्रत्येक मासाला संहिताच्या जन्मदिनांकाला आम्ही शास्त्रोक्त पूजा करायचो. त्या वेळी ती शांत असायची. इतर वेळीही धार्मिक कार्यक्रमात ती शांत असते.

३. वय ७ मास ते १ वर्ष

अ. संहिताला रांगता येऊ लागल्यावर ती रांगत देवघराजवळ जाऊन डोके टेकवून देवाला नमस्कार करायची. बाहेर इतर कुठेही देव किंवा देवाची चित्रे दिसल्यास ती डोके टेकवून नमस्कार करायची.

आ. ती लहान असतांंना माझे वैद्यकीय क्षेत्रातील पुढील शिक्षण नाशिक येथे चालू होते. त्या वेळी आम्हाला सकाळी लवकर उठून नाशिकला जाण्यासाठी निघावे लागायचे. त्या वेळी संहिताने कधीही त्रास दिला नाही.

४. वय २ ते ४ वर्षे

४ अ. उत्तम स्मरणशक्ती

अभ्यास, श्लोक किंवा इतर कुठलीही गोष्ट तिच्या लगेच स्मरणात रहाते. तिला स्तोत्र आणि श्लोक यांची विशेष आवड असून तिचे पाठांतर लवकर होते.

४ आ. समंजस

१. ती ३ वर्षांची असतांना माझे शिक्षणाचे अंतिम वर्ष चालू होते. मी परीक्षेला जातांना ती आजी-आजोबा आणि बाबा यांच्याजवळ आनंदाने रहायची अन् मला मोठ्या माणसांप्रमाणे धीर द्यायची.

२. आम्ही तिला पहिल्यापासून आयुर्वेदीय औषधेच दिली आहेत. लसीकरण केले नाही. ती आयुर्वेदीय औषधे घेण्यास कधीच त्रास देत नाही. तिच्यासाठी आम्ही कधीच टूथपेस्ट वापरली नाही. नेहमी दंतमंजनच वापरतो आणि साबण न वापरता उटणे वापरतो; परंतु या गोष्टींसाठी तिने कधीही त्रास दिला नाही.

३. ती स्वतःची खेळणी आणि खाऊ इतरांना देते.

४ इ. ती मला घरकामात साहाय्य करते.

४ ई. देवाची ओढ

१. आमच्या घरी प्रत्येक बुधवारी भजन असते. त्याची संहिताला विशेष ओढ आहे. तो दिवस तिच्या स्मरणात असतो.

२. ती सर्व उपवास आनंदाने करते. ती उपवासाच्या दिवशी कधीही जेवण मागत नाही.

३. तिला कुठलीही वस्तू किंवा खाऊ आणला, तर ती प्रथम देवासमोर ठेवते आणि ‘देवबाप्पा मला सर्वकाही देतो. माझे रक्षण करतो. माझी काळजी घेतो’, असे म्हणते.

५. वय ५ ते ६ वर्षे

५ अ. सण असल्यास नैवेद्य होईपर्यंत ती काहीच खायला मागत नाही.

५ आ. प्रेमभाव

मला किंवा तिच्या बाबांना बरे वाटत नसल्यास ती कधीच त्रास देत नाही. उलट आम्हाला साहाय्य करते. घरी कुणीही रुग्णाईत असल्यास ती त्यांना औषधे घेण्याची आठवण करून देते. ती तिच्या परीने त्यांची काळजी घेते.’

– सौ. गिरिजा विलोभ भारतीय (आई), अमरावती (जुलै २०२०)

५ इ. आवड-नावड नसणे

‘तीची खाण्या-पिण्यात विशेष आवड-नावड नाही.

५ ई. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता

५ ई १. पक्षाघाताचा झटका आलेल्या आजोबांना पाहून ‘ते देवाघरी चालले आहेत’, असे सांगणे आणि त्यानंतर काही दिवसांत त्यांचे निधन होणे : एकदा माझे मोठे दीर पक्षाघाताचा झटका आल्याने झोपाळ्यावरून खाली पडले. त्या वेळी मी सौ. गिरिजाला तिच्या घरून बोलावून घेतले. तिच्या समवेत संहिताही आली होती. त्यांना बघितल्यावर तिने लगेच ‘आबा आता देवाघरी जात आहेत’, असे म्हटले. त्याप्रमाणे पुढे काहीच दिवसांत त्यांचे निधन झाले.

५ ई २. आजीला भेटवस्तू दिल्यावर ‘तुला आणखी मोठी भेट मिळणार आहे’, असे सांगणे आणि दुसर्‍याच दिवशी एका न्यायालयीन प्रकरणाचा निकाल आजीच्या बाजूने लागल्याचे कळणे : एकदा आम्ही संहिताच्या घरी गेल्यावर ती सर्वांना भेटवस्तू देत होती. माझ्या मोठ्या जाऊबाईंना तिने भेटवस्तू दिली. त्या वेळी ती भेटवस्तू संहिताच्या हातून दिल्यामुळे त्यांना थोडे वाईट वाटले. तेव्हा संहिता लगेच आजीला म्हणाली, ‘‘आजी, तुला आणखी बरेच काही मिळणार आहे.’’ त्याच्या दुसर्‍या दिवशी जाऊबाईंच्या एका मोठ्या न्यायालयीन प्रकरणाचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्याची वार्ता मिळाली.’ (जुलै २०२०)

– श्रीमती मनीषा मराठे (संहिताच्या आईची काकू), अमरावती

६. स्वभावदोष : हट्टीपणा’

– सौ. गिरिजा विलोभ भारतीय, अमरावती (जुलै २०२०)

  • बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.