
१. खोलीचे दार उघडल्यावर शिवाच्या जागृत देवस्थानातील विभूतीला जसा सुगंध येतो, तसा आल्हाददायक सुगंध येणे : ‘२८.४.२०२० या दिवशी सकाळी मी रामनाथी आश्रमात पूजेसाठी गेलो होतो. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करतात, त्या खोलीत पूजेसाठी जातांना दार उघडल्यावर ‘विभूतीचा सुगंध दरवळत आहे’, असे मला जाणवले. शिवाच्या जागृत देवस्थानात विभूतीला जसा सुगंध येतो, तसा तो आल्हाददायक सुगंध होता. ‘या सुगंधातून मला शक्ती मिळत आहे’, असे वाटले. हा सुगंध मला बराच वेळ येत होता. हा सुगंध मी सकाळी ८.०५ वाजता आणि पुन्हा सकाळी ८.२२ वाजता अनुभवला. नंतर त्या सुगंधाची तीव्रता न्यून झाली होती, तरी तो सुगंध आल्हाददायी वाटत होता. ‘हा दैवी सुगंध मला काहीतरी देऊन जाणारा आहे’, असे मला वाटले.’
२. २६.४.२०२० या दिवसापासून त्या खोलीतील दिव्याच्या प्रकाशाची प्रखरता वाढली असून ‘त्यातून तेजतत्त्व मिळत आहे’, असे मला जाणवत होते. ९.५.२०२० या दिवशीचे तेजतत्त्व अधिक होते, तरी ते आल्हाददायक होते.’
– डॉ. अजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.५.२०२०)
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करतांना जीवनात घडणार्या कठीण प्रसंगांकडे साधना म्हणून कसे बघावे ?’, याविषयी देवाने साधिकेला सुचवलेले विचार !
आपलेपणाने आणि झोकून देऊन केलेली साधना अन् सेवा हीच गुरुकृपेचे द्वार उघडणारी गुरुकिल्ली ! – पू. शिवाजी वटकर
गुरूंच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !
आनंदसिंधु, प्रेमाचे आगर आणि धैर्याचा महामेरू असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘रुग्णाईत व्यक्तीने सतत नामजप केल्यास तिचे तीव्र प्रारब्ध हळूहळू न्यून होते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले