मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून राज्यात जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली. या अंतर्गत १९ ऑगस्ट या दिवशी मुंबई येथे यात्रा काढण्यात आली. कोरोनामुळे पोलिसांनी अनुमती नाकारली असतांनाही काढलेल्या या यात्रेप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर १९ गुन्हे नोंदवले. विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, शीव आणि गोवंडी येथील पोलीस ठाण्यात आयोजकांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये भाजपचे जिल्हाधिकारी आणि पदाधिकारी यांचाही समावेश आहे.