एका शिष्याला दिलेला गुरुमंत्राचा जप इतरांनी का करू नये ?

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘गुरुमंत्र देण्यास योग्य असणार्‍या शिष्यालाच गुरु तो मंत्र देतात. गुरुमंत्र देतांना गुरु त्या शिष्याची आध्यात्मिक पातळी, त्याची साधना करण्याची तळमळ, त्याचा भाव, प्रारब्ध यांसारख्या विविध घटकांच्या आधारे त्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक असा मंत्र सांगतात. त्यानुसार गुरूंची संकल्पशक्ती त्या मंत्राच्या समवेत कार्यरत असते. त्यामुळे गुरूंनी दिलेला मंत्र हा त्या शिष्यापुरताच मर्यादित असतो. या मंत्राचा जप इतरांनी केला, तर त्यांना त्याचा लाभ होत नाही.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


मनाचे महत्त्व !

‘पंचज्ञानेंद्रिये नाक (गंध), जीभ (चव), डोळे (दृश्य), त्वचा (स्पर्श) आणि कान (ऐकणे) हे अनुभव घेतात; पण त्यातून मिळणारे सुख-दुःख मनालाच मिळते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले