|
|
नवी देहली – गुप्तचर विभाग आणि केंद्रीय अन्वेषण विभाग न्यायव्यवस्थेला अजिबात साहाय्य करत नाहीत. जेव्हा न्यायाधीश तक्रार करतात, तेव्हा ते प्रतिसाद देत नाहीत, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. झारखंडच्या धनबाद येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्येची चौकशी करणार्या सीबीआयला न्यायाधिशांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ ऑगस्ट या दिवशी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना न्यायिक अधिकार्यांना पुरवल्या जाणार्या सुरक्षेविषयीचा अहवाल सादर करण्यास सांगितले.