मुंबई – शहरी नक्षलवादाच्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी सुधा भारद्वाज यांच्या जामिनाच्या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून यावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. ३१ डिसेंबर २०१७ या दिवशी झालेल्या एल्गार परिषदेनंतर १ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे दंगल उसळली होती. या प्रकरणात एल्गार परिषदेतील सहभागामुळे पुणे पोलिसांनी सुधा भारद्वाज यांच्यासह काही लोकांना अटक केली होती. शहरी नक्षलवादी कारवायांत सहभागी असल्याच्या आरोपावरून सुधा भारद्वाज यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.