इस्रायलच्या तेलवाहू जहाजावर ड्रोनद्वारे झालेल्या आक्रमणात २ जण ठार

दुबई – ओमानजवळ अरबी समुद्रात इस्रायलच्या तेलवाहू जहाजावर ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले असून यात जहाजाच्या चालक दलामध्ये असलेले २ जण ठार झाले. हे दोघेजण ब्रिटन आणि रोमानिया येथील रहिवासी आहेत. ही नौका इस्रायलमधील एका व्यापार्‍याची आहे.

इस्रायलच्या अधिकार्‍यांनी या घटनेला दुजोरा दिलेला नाही. इस्रायल आणि इराण यांच्यात तणाव वाढला असतांना ही घटना घडली आहे.