वेदनांमुळे होणारा लाभ !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘शरिराच्या एखाद्या भागामध्ये वेदना होऊ लागल्या की, त्यामुळे त्या भागाशी संबंधित हालचाली आपोआप अल्प होतात आणि त्यामुळे वेदनाही न्यून होतात, उदा. पायाला अस्थिभंग झाला, तर अंथरूणावर पडून रहावे लागते. त्यामुळे चालल्यामुळे जाणवणार्‍या वेदना होत नाहीत, तसेच अशा वेदनांमुळे श्रमाची कामेही करावी लागत नाहीत !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


‘शिष्याला आवश्यक ती साधना गुरु शिकवतात, हे मी अनुभवले. माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांच्या इतर शिष्यांना व्यष्टी साधना शिकवली, तर मला समष्टी साधना शिकवली.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले