बँक दिवाळखोरीत निघाल्यास ठेवीदारांना ९० दिवसांत पैसे मिळणार ! – केंद्रशासनाचा निर्णय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् या निर्णयाची माहिती देतांना (सौजन्य : ANI)

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुडीत निघालेल्या बँकेच्या ठेवीदारांना ९० दिवसांमध्ये त्यांचे पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी केंद्रशासनाने कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी या निर्णयाची माहिती दिली.