काश्मीरमध्ये चकमकीत ‘लष्कर ए तोयबा’चे २ आतंकवादी ठार !

आतंकवादी बनवण्याचा कारखाना असलेल्या पाकला नष्ट केल्यासच भारतावरील आतंकवादी आक्रमणे थांबतील, हे जाणा !

भारतीय सैनिक चकमकीच्या ठिकाणी

श्रीनगर – सोपोर भागातील वारपोरा गावात २२ जुलैला रात्रभर सैन्य आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत सैन्याने ‘लष्कर ए तोयबा’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या २ आतंकवाद्यांना ठार केले. यांतील १ आतंकवादी हा या संघटनेचा म्होरक्या होता. भारतीय सैनिक आणि नागरिक यांच्यावर झालेल्या अनेक आतंकवादी आक्रमणात त्याचा हात होता. या परिसरात शोधमोहीम चालू आहे.