पतीकडून पत्नीच्या विरोधात न्यायालयात खटला प्रविष्ट
मुसलमान तरुण हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करतात, तर मुसलमान तरुणी शीख आणि हिंदु तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात, हाही ‘लव्ह जिहाद’च होय !
चंडीगड – येथे एका मुसलमान महिलेने शीख व्यक्तीशी विवाह केल्यानंतर तिच्यावर आणि त्यांच्या लहान मुलावर इस्लाम स्वीकारण्यास दबाव आणला. त्यामुळे या शीख व्यक्तीने स्थानिक दिवाणी न्यायालयात पत्नी आणि सासरकडील व्यक्ती यांच्या विरोधात खटला प्रविष्ट केला. यावर न्यायालयाने पत्नी आणि सासरकडील व्यक्ती यांना नोटीस बजावली असून यावर २० जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे.
वर्ष २००८ मध्ये या दोघांची मैत्री झाली होती. या वेळी या महिलेने शीख व्यक्तीसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता; मात्र त्याने ती दुसर्या धर्माची असल्याने फेटाळला होता. त्या वेळी महिले आश्वासन दिले की, ती त्याच्या धार्मिक श्रद्धांच्या आड कधीही येणार नाही. त्यानंतर या दोघांनी विवाह केला; मात्र विवाहाच्या पहिल्या दिवसानंतरच महिला आणि सासरकडील व्यक्ती यांनी शीख व्यक्तीवर धर्मांतरासाठी दबाव निर्माण करण्यास चालू केले.
Chandigarh: Sikh man files case against Muslim wife, in-laws for trying to convert him and his minor son to Islamhttps://t.co/qwceX478Zl
— OpIndia.com (@OpIndia_com) July 15, 2021