संसदेतील कोणत्याही कायद्याप्रमाणे नाही, तर मंदिरामध्ये स्थानापन्न असलेल्या देवतेच्या नियमाप्रमाणेच मंदिर चालले पाहिजे. हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिर चालले पाहिजे. मंदिर प्रशासनाच्या निर्णयांचे उल्लंघन झाल्यास हिंदूंना न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. न्यायालयातही योग्य न्याय मिळाला नाही, तर हिंदू मंदिरांच्या संरक्षणासाठी प्रभावी कायदा करण्याची मागणी करू शकतात.