मुंबई, ७ जुलै – भाजपच्या १२ आमदारांनी सभागृहात कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही. भाजप हा १०६ आमदारांचा पक्ष असून निलंबनाच्या विरोधात आम्ही आता आवाज उठवणार आहोत. या संदर्भात राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली असून १२ आमदारांच्या निलंबनाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना दिली.