निधन वार्ता

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – येथील इंदिरा हाऊसिंग सोसायटीतील सनातनचे साधक श्री. पुंडलिक रेळेकर यांची लहान सून आणि पुणे सिंहगड येथील सनातनच्या साधिका सौ. पूनम प्रकाश होमकर यांची कन्या सौ. प्राजक्ता श्रीधर रेळेकर (वय २८ वर्षे) यांचे ५ जुलै या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती श्रीधर, सासू, सासरे, दीर, जाऊ, पुतण्या असा परिवार आहे. सनातन परिवार रेळेकर आणि होमकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.