मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील २ आरोपी आपत्कालीन ‘पॅरोल’साठी अपात्र !

न्यायालयाने याचिका फेटाळली

नागपूर – कोरोना संक्रमणाचे कारण देत मुंबई येथे वर्ष १९९८ मध्ये मुंबई येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील २ बंदीवानांनी आपत्कालीन ‘तातडीची अभिवचन रजा’साठी (पॅरोल) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती; मात्र या बंदीवानांनी केलेले गुन्हे आणि त्यांची पूर्वीची माहिती पहाता न्यायालयाने त्यांची याचिका गुणवत्ताहीन ठरवत ‘पॅरोल’ नाकारला आहे. आरोपी आपत्कालीन ‘पॅरोल’साठी पात्र नसल्याचे निरीक्षणही खंडपिठाने नोंदवले आहे. असगर कादर शेख आणि मोहम्मद याकूब अब्दुल मजीद नागुल अशी या २ बंदीवानांची नावे आहेत. येथील मध्यवर्ती कारागृहात ते बंदिस्त आहेत.