बीबीसीच्या व्हिडिओमध्ये भारताच्या मानचित्रातून काश्मीर आणि लडाख गायब !

विरोधानंतर चुकीचे मानचित्र हटवले; मात्र योग्य मानचित्र न लावता तिरंगा दाखवला !

  • ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच ब्रिटिशांंच्या प्रसारमाध्यमाकडून भारतद्वेषाहून वेगळे काय अपेक्षित असणार ?
  • बीबीसीकडून नेहमीच भारतद्वेष आणि हिंदुद्वेेष असणारी वृत्ते अन् लेख प्रसारित केले जातात. अशा प्रसारमाध्यमांवर भारतात बंदी घालण्याचीच मागणी आता राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी केंद्र सरकारकडे केली पाहिजे !

( या चित्राच्या माध्यमातून कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतु नसून भारताच्या मानचित्रात कशी चूक केली आहे, ते कळावे, यासाठी दिले आहे. )

नवी देहली – बीबीसीच्या इंग्रजी वृत्तवाहिनीवरील कोरोनाविषयीच्या एका वृत्ताच्या व्हिडिओमध्ये भारताचे मानचित्र (नकाशा) दाखवण्यात आले होते. यात जम्मू-काश्मीर आणि लडाख यांचा भाग हटवण्यात आला होता. याविषयी राष्ट्रप्रेमींनी विरोध केल्यानंतर हे चुकीचे मानचित्र हटवून योग्य मानचित्र दाखवण्याऐवजी भारताचा राष्ट्रध्वज दाखवण्यात आला. यामुळे राष्ट्रप्रेमींनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडे बीबीसीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.