देवतांची चित्रे असलेले कपडे घालणे; जिन्यात देवतांच्या चित्रांच्या लाद्या (फरशा) लावणे; देवतांची चित्रे विकृतपणे रेखाटणे आदी माध्यमांतून होणारे देवतांचे विडंबन रोखा !
भाषणे, पुस्तके, वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या, चित्रपट आदींच्या माध्यमातून देवता, संत आणि हिंदूंच्या धार्मिक प्रथा यांची टिंगलटवाळी करणार्यांना वैध मार्गाने जाब विचारा !
हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी बळाने वर्गणी वसूल करणे, ध्वनीप्रदूषण करणे, मिरवणुकीत मद्य पिऊन नाचणे, महिलांची छेड काढणे आदी अपप्रकार रोखा !
अपप्रकारांविरुद्ध आवाज उठवून ते रोखा !
देवळांतील उत्सवांच्या वेळी होणारे ऑर्केस्ट्रा, मनोरंजनात्मक नाटके, चित्रपट यांसारख्या अधार्मिक कार्यक्रमांचे सादरीकरण रोखून देवळांच्या पावित्र्य रक्षणासाठी प्रयत्न करा !
धर्मद्रोही विचार पसरवणारी वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाहिन्या यांवर बहिष्कार घाला !
पाकच्या कलाकारांचे चित्रपट/दूरचित्रवाहिन्या यांवरील कार्यक्रम यांवर बहिष्कार घाला !
पाकच्या कलाकारांचे चित्रपट न दाखवण्यासंबंधी चित्रपटगृहचालकांचे प्रबोधन करा !
देवतांची नावे असलेल्या मद्याच्या दुकानांची नावे पालटण्यासाठी वैध मार्गाने आंदोलन करा !
हिंदु संस्कृतीचे पालन करून संस्कृतीप्रेमी व्हा !
एकमेकांना भेटतांना ‘शेक हॅण्ड’ न करता हात जोडून नमस्कार करण्याविषयी प्रबोधन करा !
हिंदूंचे राष्ट्रपुरुष अन् क्रांतीकारक यांचे स्मृतीदिन संघटितपणे साजरे करून त्यांचे स्मरण करा !
हिंदूसंघटनासाठी सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी आदर्शरित्या साजरे करा !
फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे, मदर्स डे, ३१ डिसेंबर आदी पाश्चात्त्यांचे डे स्वत: साजरे करू नका, तसेच हे एका दिवसाचे सांस्कृतिक धर्मांतर रोखण्यासाठी प्रबोधन करा !