फेसबूकच्या हिंदुद्वेषाच्या विरोधात केंद्र सरकारकडे ‘ई-मेल’द्वारे निषेध नोंदवा !

हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी धर्मप्रेमींना केलेले आवाहन

श्री. किरण दुसे

कोणतीही पूर्वसूचना न देता फेसबूककडून हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदू अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादनांची विक्री करणारे ‘सनातन शॉप’ ही पाने बंद करण्यात आली. समितीने याविषयी पत्र पाठवल्यावर फेसबूककडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. असे करून फेसबूकने धर्मप्रसार, तसेच हिंदु धर्मजागृती करण्याच्या कार्यावर जाणीवपूर्वक बंधने आणण्याचा प्रयत्न केला आहे. याचा आपण वैध मार्गाने निषेध करणे आवश्यक आहे. त्यासाठी धर्मप्रेमींनी फेसबूकच्या हिंदुद्वेषाच्या विरोधात केंद्र सरकारकडे ‘ई-मेल’द्वारे निषेध नोंदवायला हवा.

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री. शिवदास माने यांनी मनोगत व्यक्त करतांना ‘विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने चालू केलेल्या आंदोलनात स्वतःकडून झालेले प्रयत्न आणि त्यात अन्य हिंदु बांधवांना कशा प्रकारे सहभागी करून घेतले ?’, याविषयी सांगितले.