बिलासपूर (छत्तीसगड) – एफ्.आय.आर्. प्रविष्ट करण्यापूर्वी पोलीस कुणालाही चौकशीसाठी बोलावू शकत नाहीत, असा निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. बिलासपूर जिल्ह्यातील सरकंडा पोलीस ठाण्यात ‘छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन बोर्डा’चे संचालक राजेश्वर शर्मा यांनी केलेल्या तक्रारीवरून झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा निर्णय दिला.