१. सौ. सुगंधी जयकुमार यांनी जेवणाचा डबा पाठवल्यावर भावजागृती होऊन कृतज्ञताभाव दाटून येणे
१ अ. ‘साधिकेच्या माध्यमातून प.पू. गुरुमाऊलींनी महाप्रसाद पाठवला आहे’, असे वाटणे आणि त्याच दिवशी उजव्या खांद्याला सतत जाणवणार्या असह्य वेदना नाहीशा होणे : ‘काही दिवसांपासून मला ‘फ्रोझन शोल्डर’चा (खांदा कडक होऊन त्या ठिकाणी असह्य वेदना होणे)’ त्रास होत होता. मी उजव्या हाताने काहीच करू शकत नव्हते. त्यामुळे २६.८.२०२० या दिवशी माझे यजमान श्री. रविचंद्रन् यांनी स्वयंपाक केला. दुसर्या दिवशी, म्हणजे २७.८.२०२० या दिवशी (पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांच्या वाढदिवसाच्या दिवशी) सौ. सुगंधी यांनी त्यांचे यजमान श्री. जयकुमार यांच्या समवेत माझ्यासाठी जेवणाचा डबा पाठवला. ते पाहून मला सुखद धक्का बसला. माझी भावजागृती होऊन कृतज्ञताभाव दाटून आला. ‘सौ. सुगंधी यांच्या माध्यमातून प.पू. गुरुमाऊलींनी माझ्यासाठी महाप्रसाद पाठवला आहे’, असे मला वाटले. त्याच दिवशी माझ्या उजव्या खांद्याला सतत जाणवणार्या असह्य वेदनाही थांबल्या.
१ आ. नणंदेला त्या महाप्रसादात आल्हाददायी स्पंदने जाणवणे : माझी नणंद सौ. गीता गणेश यांनी त्या महाप्रसादाचा एक घास खाल्ला. तेव्हा त्यांना ‘त्या अन्नातून पुष्कळ सकारात्मक स्पंदने येत आहेत’, असे जाणवले आणि त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्या म्हणाल्या, ‘‘अन्न स्वादिष्ट आहे; म्हणून नव्हे, तर सौ. सुगंधी यांच्यातील भावामुळे त्यातून आल्हाददायी स्पंदने जाणवत आहेत.’’
२. संध्याकाळी सौ. कल्पना यांनी खीर आणि वडे पाठवल्यामुळे ‘साधकांच्या माध्यमातून प.पू. गुरुमाऊलींनीच विविध पदार्थ खाऊ घातले’, असे वाटणे
त्याच दिवशी सायंकाळी चेन्नई येथील साधिका सौ. कल्पना यांनी त्यांचे यजमान श्री. बालाजी यांच्या समवेत माझ्यासाठी खीर आणि वडे पाठवले. माझ्या खांद्याला होत असणार्या वेदना पहाता त्या दिवशी केवळ दही-भात खाऊनही मी तृप्त झाले असते; मात्र साधकांच्या प्रेमळ कृतींच्या माध्यमातून प.पू. गुरुमाऊलींनी मला विविध पदार्थ खाऊ घातले.
३. साधकांना सर्वतोपरी सांभाळणार्या गुरुमाऊलीप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !
‘हे प्रभो, आम्ही जगात कुठेही असलो, तरी माऊलीचे वात्सल्यभरित हात आमच्यापर्यंत पोचतात आणि आमचे सांत्वनही करतात. तुम्ही संपूर्ण जगाची माता, जगन्माता आहात. देवा, तुम्ही आमचे सांत्वन करता, लाड करता, संगोपन करता आणि रक्षणही करता. त्यासाठी ‘कशा प्रकारे तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करू ?’, तेच आम्हाला कळत नाही. आम्ही स्वतःलाच तुमच्या चरणकमली समर्पित करतो.’
– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई, तमिळनाडू. (२७.८.२०२०)
‘पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वयंपाक करतांना श्री दुर्गादेवी आणि श्री अन्नपूर्णादेवी यांचा नामजप, तसेच श्रीगुरूंचे स्मरणही विनासायास होणे अन् त्यामुळे ‘मी सेवा करत आहे’ आणि ‘दैवी शक्ती माझ्या माध्यमातून सेवा करवून घेत आहे’, यांतील भेद अनुभवता येणे‘पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा तिथीनुसार वाढदिवस २७.८.२०२० या दिवशी आहे’, हे मला ठाऊक नव्हते. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये त्याविषयी छापून आल्यामुळे मला समजले. २६.८.२०२० या दिवशी रात्रीपासूनच ‘उद्या पू. (सौ.) उमाक्कांसाठी कोणते पदार्थ बनवायचे ?’, हे मला श्री गुरुकृपेने सुचत होते. मला केवळ त्या विचारांनीच आनंद होत होता. त्या रात्री मला स्वप्न पडले. स्वप्नात ‘आम्ही सहकुटुंब चेन्नई येथील श्री दुर्गादेवीच्या मंदिरात जाऊन तिचा आशीर्वाद घेत आहोत’, असे मला दिसले. ‘पू. (सौ.) उमाक्का यांच्यातील क्षात्रभावामुळे त्यांच्यात श्री दुर्गादेवीचे तत्त्व आहे’, असा माझा भाव आहे. त्यामुळे आणि रात्री पडलेल्या स्वप्नामुळे माझा उत्साह द्विगुणित झाला होता. स्वयंपाक करतांना माझा श्री दुर्गादेवी आणि श्री अन्नपूर्णादेवी यांचा नामजप आपोआप होत होता, तसेच श्रीगुरूंचे स्मरणही विनासायास होत होते. एरव्ही ‘हे सर्व मीच करत आहे’, असे मला वाटत असते. माझा कर्तेपणा कार्यरत असल्यामुळे ‘माझ्या कृतींसाठीचा प्रेरणास्रोत ही दैवी शक्ती आहे’, हे मला ओळखता येत नव्हते; मात्र या वेळी केवळ शब्दांतूनच नव्हे, तर ‘मी सेवा करत आहे’ आणि ‘दैवी शक्ती माझ्या माध्यमातून सेवा करवून घेत आहे’, यांतील भेद मला अनुभवता आला. ‘मला ही अनुभूती दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृती करतांना येऊ दे’, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते; कारण प्रत्यक्षात दैवी शक्ती आणि चैतन्य यांमुळेच माझा स्थूलदेह कार्यरत असतो.’ – सौ. सुगंधी जयकुमार, चेन्नई, तमिळनाडू. (२७.८.२०२०) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |