शाकाहारातील काही घटकांची वैशिष्ट्ये आणि परिणाम

(प्रतिकात्मक छायाचित्र)
  • गायीचे तूप, तांदूळ, गहू, डाळी आणि धान्य यांच्या सेवनाने सत्त्वगुणाची वृद्धी होऊन माणूस सत्त्वगुणी होतो.
  • म्हशीच्या तुपाच्या सेवनाने स्निग्धता वाढून रक्तातील स्निग्धाम्लाचे (‘कोलेस्टेरॉल’चे) प्रमाण वाढते, तर गायीच्या तुपाच्या सेवनाने रक्तातील स्निग्धाम्लाचे प्रमाण वाढत नाही.
  • गायीचे दूध, तूप, फळे आणि पालेभाज्या यांमध्ये श्रीविष्णुतत्त्व जास्त असते. कंदमुळांमध्ये पृथ्वीतत्त्व जास्त असते.
  • शाकाहारातील तळलेले पदार्थ नियमित खाल्ल्यामुळे रज-तम गुणांची वृद्धी होऊन कामवासना उद्दीपित होतात.
  • दुधाने सत्त्वगुणाची वृद्धी होते; परंतु दुधावर प्रक्रिया करून इतर पदार्थ (विशेषतः दूध नासवून केलेले पदार्थ) बनवल्यास त्यातील सत्त्वगुण घटून रजोगुण वाढतो.