सत्त्वगुणी आहाराचे लाभ !

​‘शाकाहाराने मनुष्य सत्त्वगुणी बनतो. सत्त्वगुणाच्या संवर्धनाने त्याची आध्यात्मिक उन्नती होते, म्हणजेच नरजन्माचे सार्थक करणार्‍या सत्त्वगुणी आहाराचे सेवन करणे, म्हणजेच धर्मपालन करणे. धर्मपालन म्हणजेच योग्य आचारसंहितेचा स्वीकार करून त्याप्रमाणे आपले आचरण करून धर्माला, परिणामी ईश्‍वराला आवडणे. शाकाहारातून देहातील तमोगुणाचा लय होतो आणि मनुष्य देवसंस्कृतीकडे प्रवास करू लागतो. नराचा नारायण बनवण्याचे कार्य शाकाहार करत असल्याने तो करणे, हे धर्मपालन करण्याच्या तोडीचेच आहे.’

– एक विद्वान [श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ४.३.२००८, रात्री ७.५१]

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.