आषाढी वारीविषयीच्या सरकारच्या निर्णयावर पंढरपूर येथील व्यापार्‍यांची अप्रसन्नता !

सरकार निवडणुका घेते, मग वारीला विरोध का ? – व्यापार्‍यांचा सरकारला प्रश्‍न

संग्रहित चित्र

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – सरकारच्या आषाढी वारीविषयीच्या निर्णयानंतर येथील व्यापार्‍यांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे. आपली उपजिविका वारीवरच अवलंबून असल्याने वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मागील वर्षीही वारी झाली नसल्याने व्यापार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात शासनाने मंदिरही  बंद ठेवले आहे. सरकार निवडणुका घेते, मग सरकारचा वारीला विरोध का ?, असा प्रश्‍नही येथील व्यापार्‍यांनी उपस्थित केला आहे.

जिल्हा प्रशासनाने ७ जूनपासून सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शहरातील व्यापार्‍यांना दुकाने उघडण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे; मात्र श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद असल्यामुळे येथे भाविकांचे येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे सरकारने कोरोना संसर्गाविषयी योग्य ती काळजी घेत श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करावे, अशी मागणीही या वेळी व्यापार्‍यांनी केली आहे.