निधन वार्ता

बेळगाव – येथील हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक आणि ‘विकी गुड्स कॅरियर’चे संचालक विलास नारायण गौंडाडकर (वय ५६ वर्षे) यांचे ८ जून या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून, पुतण्या, असा परिवार आहे. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित राष्ट्रीय हिंदू अधिवेशनात सहभागी होत असत. हिंदु जनजागृती समिती गौंडाडकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.