‘वैशाख अमावास्या (१०.६.२०२१) या दिवशी मूळच्या जळगाव येथील आणि सध्या रामनाथी आश्रमात सेवा करणार्या कु. आदिती जाधव यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकाच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. आदिती जाधव यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. प्रेमभाव
‘कु. आदितीताईमध्ये सहजता असून ती सर्वांशी प्रेमाने वागून जवळीकता निर्माण करते.
२. परिस्थिती स्वीकारून आनंदी रहाणे
काही दिवसांपूर्वी तिच्या पायाला लागल्याने ती खोलीतच असायची. ती त्याही स्थितीत स्थिर आणि आनंदी राहून तिला जमेल, तशी सेवा करत होती.
३. साधनेचे गांभीर्य
सध्या ताईचे शिक्षण चालू असून त्यातून वेळ मिळाल्यावर ती नामजप आणि व्यष्टी साधना पूर्ण करण्यासाठी तळमळीने अन् गांभीर्याने प्रयत्न करते.
४. परिपूर्ण सेवा करणे
ती प्रत्येक सेवा स्वीकारून मनापासून आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ती सेवेत येणार्या अडचणी संबंधित साधकांना विचारून सेवा परिपूर्ण करते. ताई नवीन असूनही वेगवेगळ्या सेवा शिकून कुशलतेने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते.
५. चुकांविषयी संवेदशीलता
ती स्वतःच्या चुका साधकांना विचारते आणि इतरांच्या लक्षात आलेल्या चुका सांगून त्यांनाही साधनेत साहाय्य करते.
‘देवा, आम्हाला साधकांच्या प्रयत्नांतून शिकून तुला अपेक्षित असे घडव आणि आम्हाला तुझ्या कोमल चरणी घे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
– एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.५.२०२१)
गुरु लाभलेत या जीवनात, करतील पार तुला भवसागरातून ।आज आहे वाढदिवस । आनंदमयी आदितीचा । बोलण्यात आहे सहजता । स्वीकारूनी प्रत्येक सेवा । अंतरी आहे भाव जिच्या । गुरूंप्रती पुष्कळ सारा । म्हणूनी साद देती गुरु तुझ्या प्रयत्नांना । गुरु लाभलेत या जीवनात । आता जा शरण श्री गुरूंना । प्राप्त कर तू गुरुचरणांना ।। – एक साधक (५.५.२०२१) |