बांका (बिहार) येथील मदरशाजवळील स्फोट बॉम्बमुळेच !

मौलानाचा मृत्यू

या घटनेविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !

स्फोटामुळे पडलेली मदरशाची इमारत

बांका (बिहार) – येथील नवटोलियामधील एका मदरशाजवळ झालेल्या स्फोटात मदरशाची इमारत उद्ध्वस्त झाली. फॉरेंसिक पथकाने केलेल्या प्राथमिक चौकशीत हा बॉम्बचा स्फोट आहे, असे म्हटले आहे. या स्फोटात मौलाना अब्दुल सत्तार मोकिन याचा मृत्यू झाला, तर ४ जण घायाळ झाले. घायाळ झालेले चौघेही पसार झाले आहेत. तसेच आजूबाजूचे काही पुरुष घर सोडून पळून गेले आहेत, तर महिलांनी मौन बाळगले आहे, असे समोर आले आहे.