देहलीतील जी.बी. पंत रुग्णालयात परिचारिकांना मल्ल्याळम् भाषेत बोलण्यावर बंदी घालणारा आदेश रहित

नवी देहली – येथील गोविंद बल्लभ पंत रुग्णालयाने परिचारिकांनी कामाच्या वेळी मल्ल्याळम् भाषेचा वापर न करण्याचा काढलेला आदेश विरोधामुळे रहित करण्यात आला आहे. हिंदी आणि इंग्रजी भाषा यांचाच संवादासाठी वापर करण्यात यावा, असे आदेशात म्हटले होते. याचे पालन न करणार्‍यांवर कारवाई करण्याची चेतावणी देण्यात आली होती. एका रुग्णाने परिचारिकांविषयी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे तक्रार केल्यानंतर हा आदेश काढण्यात आला होता. देहलीतील विविध रुग्णालयांतील परिचारिकांनी याला संघटितपणे विरोध केल्याने हा आदेश अखेर मागे घ्यावा लागला.