सावंतवाडीत ‘रॅपिड टेस्ट’चा अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आलेल्यांनाच व्यवसाय करता येणार

सावंतवाडी – कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता विषाणूची साखळी तोडण्यासाठी शहरातील व्यापारी, भाजीविक्रेते, रिक्शाचालक आणि विनाकारण फिरणारे नागरिक यांची ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी करण्याची मोहीम नगरपरिषदेने हाती घेतली आहे. ज्यांच्या चाचणीचा अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) येईल, त्यांनाच त्यांची दुकाने चालू ठेवता येणार आहेत. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्योग आणि व्यापार विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले आहे.