हिंदु देवतांशी संबंधित सर्व नियमांना घटनात्मक संरक्षण ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

हिंदूंच्या देवतांच्या संदर्भातील सर्व नियमांना राज्यघटनेतील कलम १३ नुसार घटनात्मक संरक्षण आहे. ‘भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी जे नियम, कायदे होते, ते तसेच चालू रहातील. सध्याची संसद जर त्यांच्या उल्लंघनास कारणीभूत कायदे करेल, तर ते टाळले जावेत’, असे घटनेतील कलम १३ मध्ये म्हटलेले आहे. ‘कलम २१ नुसार प्रत्येकाला गोपनीयता जोपासण्याचा अधिकार आहे’, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या ९ न्यायाधिशांनी दिला आहे. त्यामुळे आमच्या मंदिरात कुणी यावे आणि कुणी नाही, याविषयीचा निर्णय घेणे, हा आमचा खासगी प्रश्‍न असून असे करण्याचा आमचा अधिकार आहे. मंदिरांमध्ये अहिंदु आणि श्रद्धाहीन लोकांनी घुसखोरी केल्याच्या विरोधात भा.दं.वि. २९५ (अ) नुसार कोणताही हिंदु धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करून तक्रार प्रविष्ट करू शकतो.