मुख्य सर्व्हर हॅक करून ‘बिटकॉइन’मध्ये मागितली खंडणी !

(‘हॅकर्स’ म्हणजे ज्यांना संगणक प्रणाली, सॉफ्टवेअर आणि नेटवर्कमधील तांत्रिक त्रुटींची सखोल माहिती असते. याद्वारे ते कुणाच्याही सुरक्षित संगणक यंत्रणेत अनधिकृतपणे घुसखोरी करून हानी पोचवतात.)
चंद्रपूर – येथील नामांकित ‘चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशन’च्या मुख्य सर्व्हरवर अज्ञात हॅकर्सनी मोठे सायबर आक्रमण केले. रुग्णालयाचा गोपनीय डिजिटल डेटा लॉक करून तो पुन्हा मिळवून देण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी १.२३४५६ ‘बिटकॉईन’ची (७१ लाख रुपयांची) (‘बिटकॉइन’ हे ‘डिजिटल’ किंवा ‘आभासी’ चलन) खंडणी मागितली. या प्रकरणी सतीश थरवानी यांनी केलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात हॅकर्सविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१. १ जूनला सकाळी ७.३० वाजता रुग्णालयाच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाला मुख्य सर्व्हरच्या कामकाजात अचानक तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. तज्ञांच्या पडताळणीत त्यांना ‘हॅकर्स’चा संदेश दिसला. सायबर आक्रमणामुळे रुग्णालयाची ‘हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम’ (रुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणाली) कोलमडली.
२. या यंत्रणेच्या माध्यमातून कर्करोगग्रस्त रुग्णांचे वैद्यकीय अहवाल, केस पेपर, उपचारांचा इतिहास आणि रुग्णालयाचे दैनंदिन व्यवस्थापन चालवले जाते.
३. पैसे मिळाल्यास माहिती कुणालाही विकणार नसल्याचे ‘हॅकर्स’नी सांगितले.
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास सुमारे ५६ लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका दान !