
मुंबई – वरळी डोम येथे आयोजित केलेल्या ‘कॉन्सर्ट’मध्ये (संगीत कार्यक्रमात) वृषभ महेंद्र गांगुर्डे (वय २८ वर्षे) याची प्रकृती बिघडून त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. वृषभ हा माहीम येथील रहिवासी होता. तो नशेत होता. त्याच्या समवेत असलेली त्याची मैत्रीण प्रज्ञान रे (वय २८ वर्षे) हीसुद्धा दारूच्या नशेत होती. रात्री ९ वाजता दोघांची प्रकृती बिघडली. दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. तरुणीची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांच्या अन्वेषणात अमली पदार्थ सेवनाचे पुरावे सापडले नाहीत. त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांची गर्दी होती. त्या वेळी दोघांनाही गुदमरल्याचा त्रास होत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
वृषभची मैत्रीण ओडिशा राज्यातून पाश्चात्त्य संगीताच्या कार्यक्रमासाठी मुंबईमध्ये आली होती. तिने मद्यपानासह ‘एनर्जी’ पेय प्राशन केल्याने तिला अस्वस्थ वाटत होते, अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली.
काही दिवसांपूर्वीच गोरेगाव येथील नेस्कोमध्ये झालेल्या कार्यक्रमात अमली पदार्थांच्या अतीसेवनामुळे दोघांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर ताडदेव पोलिसांनी वरळी डोम येथील कार्यक्रमाला अनुमती नाकारली होती; पण वरिष्ठांच्या सूचनांमुळे स्थानिक पोलिसांनी कार्यक्रमाला अनुमती दिली. (अशी सूचना देणार्या ‘वरिष्ठां’ची नावे उघड करून त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, अशी जनतेची मागणी आहे ! – संपादक)
याविषयी ‘वरळी डोम क्लब’चे सदस्य सुरेंद्र दुग्गल म्हणाले की, या कार्यक्रमाला मी आलो होतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवक आले होते. झालेल्या प्रकाराविषयी वरळी डोमच्या व्यवस्थापनाला दोषी धरायला हवे. कार्यक्रमाला पोलिसांनी अनुमती कशी दिली, याचेही अन्वेषण व्हायला हवे.
गोरेगावमधील संगीत कार्यक्रमात अमली पदार्थांच्या अतीसेवनामुळे दोघांचा मृत्यू झाला असतांनाही अशा कार्यक्रमांचे आयोजन होतेच कसे ? या प्रकरणी आयोजकांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
दोषींवर कारवाई होणार ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
या प्रकरणी जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. गोरेगावमधील नेस्को प्रकरणातही कडक कारवाई करत पोलिसांनी सखोल अन्वेषण केले होते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
कार्यक्रमाच्या प्रवेशशुल्कासाठी ४ सहस्र रुपये आकारले !
‘स्पेसबाऊंड’ या आस्थापनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रकरणी आस्थापनांच्या आयोजकांची पोलिसांकडून चौकशी चालू आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशशुल्कासाठी प्रत्येकाकडून ४ सहस्र रुपये आकारण्यात आले होते. (अमली पदार्थांच्या आकर्षणापायी तरुण पिढी कितीही पैसा ओतायला सिद्ध असते ! – संपादक )
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !