वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे दापोलीतील नागरिक त्रस्त

दापोली – तालुक्यात वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्याला कंटाळून स्वरूप महाजन या ग्राहकाने चक्क येथील महावितरण कार्यालयाच्या दारातच रात्रभर झोपून अनोखे आंदोलन केले. ‘वीज नाही, तर झोप तरी कुठे घ्यायची ?, असा प्रश्न विचारत महाजन यांनी हे आंदोलन केले. या आंदोलनाचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला असून तालुक्यातून या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला आहे. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत् झाल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. या वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास या पुढील काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार, अशी चेतावणीही या वेळी देण्यात आली.
दापोली तालुक्यात मागील काही दिवसांत कडक उन्हाळा आहे. अशा परिस्थितीत घंटोन्घंटे येथील वीज गायब होत असल्याने लहान मुले, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे पर्यटन क्षेत्र असल्याने येथील हॉटेल व्यावसायिक, व्यापारी आणि पर्यटन उद्योगाला वीज खंडित होण्यामुळे मोठी आर्थिक हानी होत आहे. यापूर्वी अनेकदा निवेदने आणि तक्रारी देऊनही वीज समस्येवर कोणताही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही, या पार्श्वभूमीवी महाजन यांनी हे आंदोलन केले होते.
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ जुलैला रत्नागिरी येथे विशेष कार्यक्रम