‘कॉर्पोरेट जिहाद’च्या षड्यंत्राच्या विरोधात आज चिपळूणमध्ये होणार्‍या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा !

  • हिंदु जनजागृती समितीच्या पत्रकार परिषदेत हिंदूंना आवाहन !

  • आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

डावीकडून सर्वश्री अनुराग उतेकर, बोलतांना डॉ. हेमंत चाळके, निहार कोवळे, परिमल भोसले आणि प्रशांत उतेकर

चिपळूण, ७ जून (वार्ता.) – नाशिक येथील टी.सी.एस्. (TCS) आस्थापनेसह पुणे येथील विप्रो आणि मुंबईतील एस्.बी.आय. सारख्या मोठ्या कॉर्पोरेट संस्थांमध्ये हिंदु तरुणींना लक्ष्य करून त्यांचे पद्धतशीरपणे धर्मांतरण करण्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. या भयंकर संकटाविषयी हिंदु समाज आणि पालक यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोमवार, ८ जून २०२६ या दिवशी सायंकाळी ५:३० वाजता चिपळूण येथे एका ‘विशेष जनसंवादा’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीच्या वतीने डॉ. हेमंत चाळके यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. या वेळी त्यांनी समितीचे राज्यभर चालू असलेले अभियान आणि जनसंवादाला उपस्थित रहाणार्‍या वक्त्यांचीही माहिती दिली. ‘या कार्यक्रमाला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित रहावे’, असे आवाहनही त्यांनी केले.

या वेळी पत्रकार परिषदेला शिवसेना गुहागर विधानसभा क्षेत्र निरीक्षक श्री. अनुराग उतेकर, नगरसेवक श्री. निहार कोवळे, शिवसेना कार्यकर्ते श्री. परिमल भोसले आणि हिंदुराष्ट्र समन्वय समितीचे श्री. प्रशांत उतेकर उपस्थित होते.

‘बेटी सुरक्षित, तो राष्ट्र सुरक्षित’ अभियान

हिंदु कुटुंबव्यवस्था आणि समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने संपूर्ण महाराष्ट्रात ‘बेटी सुरक्षित तो राष्ट्र सुरक्षित’ हे अभियान चालू केले आहे. या अभियानांतर्गत कोकण विभागातील हा पहिलाच मोठा कार्यक्रम चिपळूण येथे होत आहे.

प्रमुख वक्त्यांची लाभणार उपस्थिती !

या जनसंवाद कार्यक्रमाला पुढील प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत !

१. रमेश शिंदे (राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती आणि ‘लव्ह जिहाद’ ग्रंथाचे संकलक)
२. अधिवक्त्या (सौ.) प्रीती राऊत (मुंबई, कायदेशीर समुपदेशक)
३. डॉ. नीलेश राणे (आमदार आणि शिवसेना नेते)

पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन

पत्रकार परिषदेत नगरसेवक निहार कोवळे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला परकीय आक्रमकांपासून मातृभूमी आणि माता-भगिनींचे रक्षण करण्याची शिकवण दिली आहे. आज कॉर्पोरेट क्षेत्राच्या माध्यमातून हा प्रकार केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित नसून त्याची कीड आता ग्रामीण आणि निमशहरी भागांतही पसरत आहे. त्यामुळे राजकारण आणि पक्षभेद बाजूला ठेवून आपल्या पुढच्या पिढीच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण हिंदु समाजाने, तरुण-तरुणी आणि पालक यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आम्ही करत आहोत.