बुलडाणा – येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी ‘उपवास वगैरे न करता मांसाहार करावा’, असा उपदेश दिला होता. गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर वाद झाल्यानंतरही ते स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यानंतर १६ मे या दिवशी येथील स्त्री रुग्णालयातील कोरोना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना रुग्णालयात जाऊन त्यांनी मांसाहाराचे जेवण दिले.
‘कोरोनामध्ये मंदिरेही बंद आहेत.. देव पण लॉक करण्यात आले आहेत.. तुम्हाला वाचवायला कुणी येणार नाही…स्वतःच स्वतःची काळजी घ्यावी लागेल…म्हणून हे उपास-तापास बंद करा…प्रतिदिन ४ अंडी खा…एक दिवसाआड चिकन खा आणि प्रोटीनयुक्त भरपूर आहार खा..’, असा उपदेश त्यांनी दिला होता.