इस्रायलकडून गाझा सीमेवर सैन्य तैनात

  • पॅलेस्टाईनवर भूमी आणि हवाई मार्गे आक्रमणे चालूच

  • इस्रायलचे सैन्य पॅलेस्टाईनमध्ये घुसण्याची शक्यता

तेल अवीव – इस्रायलने गाझापट्टीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले असून चहुबाजूने आक्रमण करण्याची सिद्धता चालू केली आहे. इस्रायली सैन्याने त्याचे रणगाडे तैनात केले असून पॅलेस्टाईनच्या भागांत गोळीबार चालू आहे. यासह लढाऊ विमानांमधून हवाई आक्रमणे चालूच आहेत. यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

‘हमास’ या जिहादी आतंकवादी संघटनेकडून होत असलेल्या आक्रमणाच्या विरोधात इस्रायलने ९ सहस्र राखीव सैनिकांना सेवेत रुजू होण्याचा आदेश दिला आहे. इस्रायली अधिकार्‍यांनी सीमा भागात रहाणार्‍या नागरिकांना बंकरमध्ये जाण्याची सूचना केली आहे. इस्रायलने केलेल्या कारवाईच्या विरोधात हमासकडून रॉकेटद्वारे आक्रमण होण्याची शक्यता अधिकार्‍यांनी व्यक्त केली. इस्रायलचे सैन्य पॅलेस्टाइनमध्ये घुसण्याची शक्यता असून त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इस्रायलमध्ये ज्यू आणि अरबी समुदाय यांच्यात दंगल !

यावरून मुसलमान ज्या देशात रहातात त्या देशाशी ते कधीही एकनिष्ठ नसतात, हेच सिद्ध होते ! ते जगात कुठेही असो, त्यांच्यासाठी नेहमी त्यांचा धर्म प्रथम असतो !

इस्रायलमधील काही शहरांमध्ये ज्यू आणि मूळ अरबी समुदाय यांच्यात दंगली चालू असल्याचे वृत्त आहे. दोन्ही समुदायांकडून एकमेकांवर आक्रमणे केली जात आहेत. काही ठिकाणी वाहनांना आग लावण्यात आली आहे. हिंसाचारामुळे इस्रायलमधील प्रमुख विमानतळावरून होणारी उड्डाणेही रहित करण्यात आली आहेत.