सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात ७ दिवसांचा जनता कर्फ्यु : दूध, वैद्यकीय सेवा वगळता सर्व बंद रहाणार


सांगली, ३ मे (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात ५ ते ११ मे या कालावधीत ७ दिवसांचा जनता कर्फ्यु घोषित करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात वाढत असणार्‍या रुग्णसंख्येवर नियंत्रण यावे यांसाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकारी यांची तातडीची बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला. या जनता कर्फ्युमधून अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, दूध वगळता सर्व आस्थापना आणि व्यवसाय बंद रहाणार आहेत. या बैठकीस उपमहापौर उमेश पाटील, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, विरोधीपक्षनेते उत्तम साखळकर यांसह अन्य उपस्थित होते.