श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २०७ जणांचे रक्तदान !

शिबिरात सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देतांना आमदार श्री. सुधीर गाडगीळ (मध्यभागी), डावीकडे श्री. नितीन चौगुले

सांगली – श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २०७ जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन डॉ. देवपाल बरगाले आणि डॉ. अभिषेक दिवाण यांनी केले. या शिबिरात ज्यांनी रक्तदान केले त्यांना भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येणार्‍या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यांसाठी याचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक श्री. नितीन चौगुले, नवी मुंबई विभाग प्रमुख श्री. भरत माळी, श्री. रामभाऊ जाधव, श्री. आनंदराव चव्हाण, शिवसेनेचे श्री. हरिभाऊ पडळकर, श्री. सतीश खांबे यांच्यासह सर्व युवा हिंदुस्थानचे सांगली-मिरज मधील सहकारी उपस्थित होते. या शिबिरास वसंतदादा सर्वोपचार रुग्णालय आणि हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड बँक, यांचे सहकार्य लाभले.