जनतेने याविषयी कृती करावी, यासाठी राजनाथ सिंह यांनी सरकारी स्तरावरून लोकांना सांगितले पाहिजे आणि त्यांच्याकडून साधना करून घेतली पाहिजे !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – कोरोनाच्या युद्धात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी असलेला लोकांचा संबंध औषधाच्या रूपात काम करील, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे एका कार्यक्रमात केले. ‘कोरोनाबाधितांना बरे करण्यासाठी सस्वर रामचरितमानसचे पठण करणेही वरदान ठरू शकते’, असेही त्यांनी सांगितले. या वेळी लोकगायिका मालिनी अवस्थी यांनी महटले की, सस्वर श्री रामचरितमानसचे अर्थासहित गायन लोकांचे लक्ष नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वळवण्यासाठी पुष्कळ लाभदायक ठरू शकते.
कोरोनाच्या काळात धर्माशी जोडलेले असणे महत्त्वाचे ! – स्वामी अविमुक्तेश्वरानंद![]() द्वारका आणि ज्योतिष पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे उत्तराधिकारी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, कोरोनाच्या काळात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी जोडलेले असणे महत्त्वाचे आहे. लोकांनी शास्त्र आणि वेद यांचे पठण करण्याचा हा योग्य काळ आहे. याचा भरपूर उपयोग करून लोक स्वतःला या महामारीपासून वाचवू शकतात. आपल्या सांस्कृतिक ठेव्याला जाणण्याचाही हा चांगला काळ आहे. |

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
सनातन संस्थेच्या साधकांचे एक वेगळे वैशिष्ट्य : गुरुकृपेने सूक्ष्मातील जाणू शकणे !
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Corona : आंध्रप्रदेशात २० दिवसांत आढळले कोरोनाचे १२ नवीन रुग्ण !