हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष संवादांतर्गत ‘अहिन्दु और श्रद्धाहीन का मंदिर प्रवेश वर्जित हो’ या विषयावर चर्चासत्र
मुंबई – राज्यघटनेतील कलम २६ नुसार मंदिरांशी संबंधित निर्णय घेण्याचा, तसेच समस्या सोडवण्याचा संबंधित मंदिर प्रशासनाला अधिकार आहे. त्यामुळे मंदिरात कुणी प्रवेश करावा आणि कुणी नाही ? याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार राज्यघटनेने मंदिर प्रशासनाला बहाल केलेला आहे, असे प्रतिपादन हिंदु फ्रंट फॉर जस्टिसचे प्रवक्ते अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले. डासना (उत्तरप्रदेश) आणि कोरगज्जा (कर्नाटक) येथील मंदिरांत धर्मांधांनी प्रवेश करून मंदिराची विटंबना केली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या अंतर्गत ‘अहिन्दु और श्रद्धाहीन का मंदिर प्रवेश वर्जित हो’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र घेण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात ‘सुदर्शन’ वाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके, डासनादेवी मंदिराच्या महंत यति मा चेतनानंद सरस्वती, श्रीराम सेनेचे कार्याध्यक्ष श्री. गंगाधर कुलकर्णी, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या कु. कृतिका खत्री यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. हा कार्यक्रम २१ सहस्रांहून अधिक जणांनी पाहिला.
मूर्तींची तोडफोड करणार्या जिहाद्यांना मंदिरात प्रवेश नाही ! – सुरेश चव्हाणके
जेव्हापासून हिंदुस्थानात इस्लाम आला आहे, तेव्हापासून मंदिरांवर आक्रमणे होत आहेत. हिंदु राजांवर आक्रमण होण्याआधी मंदिरांवर आक्रमण केले जायचे. तुळजाभवानीदेवीचे मंदिर असो, पंढरपूर येथील मंदिर असो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आक्रमण करण्यासाठी येणारा प्रत्येक सरदार आधी मंदिरांवर आक्रमण करायचा. आपली शक्तीपीठे आणि ज्योतिर्लिंगे या सर्वांची तोडफोड झाली आहे. स्वातंत्र्यानंतर निर्माण केलेल्या राज्यघटनेनुसार अशा घटना कायदेशीर अपराधांच्या कक्षेत येत नाहीत. जर राज्यघटनेत मंदिरे (मंदिरांची सुरक्षा) नाहीत, तर ती राज्यघटनेनुसार का चालवता ? मंदिरे हिंदु राज्यघटनेनुसार चालायला हवीत. जिहादी मंदिरात येऊन मूर्तींची तोडफोड करतात. अशा आपत्कालीन स्थितीत मंदिरात अहिंदूंना प्रवेश न देण्याच्या निर्णयात आजिबात पालट होणार नाही.
मंदिरात अहिंदूंना प्रवेश असावा कि नसावा ? यासंबंधी ‘सुदर्शन’ वाहिनीवर घेतलेल्या कार्यक्रमात केवळ १ घंट्यात ९८ टक्के लोकांनी ‘मंदिरात अहिंदूंना प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध असावा’ असे मत नोंदवले. डासना येथील मंदिरातील घटनेनंतर अनेक मंदिरांत ‘अहिंदूंना प्रवेश नाही’ अशा प्रकारचे फलक लागले आहेत. नेपाळ येथेही अशा प्रकारचे फलक लागले आहेत. त्यामुळे हिंदु समाजाने हे आंदोलन अधिक गांभीर्याने घेतले आहे. डासना येथील घटनेनंतर देशात अनेक राज्यांत यति नरसिंहानंद सरस्वती यांची भगव्या वस्त्रांतील छायाचित्रे रस्त्यावर चिकटवणे, ती पायदळी तुडवली जाणे आदी अपप्रकार घडत आहेत. राजकीय नेत्यांचे पुतळे जाळणार्यांवर जर गुन्हे नोंद होतात, तर सरकार एका हिंदु साधूचा अवमान करणार्यांवर गुन्हा का नोंद करत नाहीत ? यति नरसिंहानंद सरस्वती यांचे शीर धडावेगळे केले जाईल, अशा प्रकारची कायदाद्रोही भाषा का खपवून घेतली जाते ?
मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या धर्मांधाला मारहाण झाली, हा अपप्रचार खोटा ! – महंत यति मा चेतनानंद सरस्वती
डासनादेवी मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या आसिफ या मुलाला मारहाण करण्यात आली, हा अपप्रचार खोटा असून हे साम्यवाद्यांचे षड्यंत्र आहे. प्रत्यक्षात मंदिराच्या बाहेर पिण्यासाठीच्या शुद्ध पाण्याचे नळ उपलब्ध आहेत. मंदिरात घुसलेला धर्मांध मुलगा मंदिरातील शिवलिंगावर मूत्रविसर्जन करतांना पकडला गेला होता. मंदिरात मूत्रविसर्जन करणे, दानपेटीतील रक्कम चोरणे, देवीच्या अलंकारांची चोरी होणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. मंदिरातील पुजार्यांवर धर्मांधांकडून गोळीबारही करण्यात आला होता.
डासना भागात ९५ टक्के धर्मांध रहातात. ते मंदिरात येणार्या महिलांची छेडछाड करणे, तसेच महिलांकडे पाहून अश्लील कृत्ये करत असतात. या सर्व प्रकारांविषयी पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार देऊनही हे प्रकार थांबले नाहीत. त्यामुळे यति नरसिहानंद सरस्वती यांनी मंदिरांत धर्मांधांना प्रवेश निषिद्ध केला. ‘मंदिरात मुसलमानांना प्रवेश नाही’, हा भाग आसपासच्या भागातही ठाऊक आहे. तरीही धर्मांध मुलगा मंदिरात घुसला होता. आमच्या मुली-महिलांचे, मंदिराच्या धनाचे, देवतांच्या प्रतिमांचे आणि मूर्तींचे रक्षण करावे, हे धर्मगुरु या नात्याने आमचे कर्तव्य आहे, तसेच राज्यघटनेनुसार आम्हाला हा अधिकारही आहे.
मंदिरांतील धन लुटणे आणि हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करणे, हे धर्मांधांचे षड्यंत्र ! – गंगाधर कुलकर्णी
मंगळुरू येथील कोरगज्जा देवस्थानाच्या दानपेटीत ३ धर्मांध युवकांनी गर्भनिरोधक टाकले. या कृत्यानंतर त्या तिघांमधील नवाज याने रक्त येईपर्यंत स्वत:चे डोके भिंतीवर आपटून घेतले. यात त्याचा मृत्यू झाला. अन्य दोघांनीही त्रास होऊ लागल्यावर भीतीमुळे त्यांनी स्वत:चा गुन्हा मान्य केला. गेल्या १० वर्षांत अनेक मंदिरांमध्ये दानपेटीतील रकमेची चोरी, मूर्तींची चोरी आणि तस्करी झाली आहे. या गुन्ह्यांमध्ये जे गुन्हेगार पकडले गेले, ते सर्व धर्मांध आहेत. मंदिरांतील धन लुटणे आणि हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करणे, हे धर्मांधांचे षड्यंत्र आहे. या पाठीमागे एस्.डी.पी.आय. आणि पी.एफ्.आय. या संघटना आहेत. याविषयी समाजात जागृती करणे आवश्यक आहे.
भारतभरातील मंदिरात श्रद्धाहीनांना कदापि प्रवेश मिळू नये ! – कृतिका खत्री
मंदिरात जातांना ‘साक्षात् भगवंताला भेटण्यासाठी जात आहे’, असा श्रद्धावान हिंदूंचा भाव असतो. या श्रद्धेने आणि भावाने जेव्हा हिंदू मंदिरात जातात, तेव्हा त्यांना भगवंताचा आशीर्वाद मिळतो अन् त्यांचे दु:ख दूर होऊन त्यांना चैतन्याची, तसेच आनंदाची अनुभूती येते. डासना आणि कोरगज्जा येथील घटना अत्यंत घृणायुक्त आहेत. असे अपप्रकार नास्तिक आणि जिहादी करत असून त्यांना रोखण्याची आवश्यकता नाही का ? सर्व मंदिरांचा कारभार हिंदूंच्या दानावर चालतो. धर्मांतरित हिंदू जर मंदिरात येऊ इच्छित असतील, तर त्यांचे अवश्य स्वागत केले जाईल; परंतु जे श्रद्धाहीन आहेत, त्यांना मंदिरात प्रवेश कदापि प्रवेश मिळू नये. भारतभरातील मंदिरांत हा प्रवेश निषिद्ध असावा.
अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे
हिंदु देवतांशी संबंधित सर्व नियमांना घटनात्मक संरक्षण !
हिंदूंच्या देवतांच्या संदर्भातील सर्व नियमांना राज्यघटनेतील कलम १३ नुसार घटनात्मक संरक्षण आहे. ‘भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी जे नियम, कायदे होते, ते तसेच चालू रहातील. सध्याची संसद जर त्यांच्या उल्लंघनास कारणीभूत कायदे करेल, तर ते टाळले जावेत’, असे घटनेतील कलम १३ मध्ये म्हटलेले आहे. ‘कलम २१ नुसार प्रत्येकाला गोपनीयता जोपासण्याचा अधिकार आहे’, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या ९ न्यायाधीशांनी दिला आहे. त्यामुळे आमच्या मंदिरात कुणी यावे आणि कुणी नाही, याविषयीचा निर्णय घेणे, हा आमचा खासगी प्रश्न असून असे करण्याचा आमचा अधिकार आहे. मंदिरांमध्ये अहिंदू आणि श्रद्धाहीन लोकांनी घुसखोरी केल्याच्या विरोधात भा.दं.वि. २९५ (अ) नुसार कोणताही हिंदु धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार प्रविष्ट करू शकतो.
हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिराचे प्रशासन चालले पाहिजे !
संसदेतील कोणत्याही कायद्याप्रमाणे नाही, तर मंदिरामध्ये स्थानापन्न असलेल्या देवतेच्या नियमाप्रमाणेच मंदिर चालले पाहिजे. हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिर चालले पाहिजे. मंदिर प्रशासनाच्या निर्णयांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा हिंदूंना अधिकार आहे. न्यायालयातही योग्य न्याय मिळाला नाही, तर हिंदू मंदिरांच्या संरक्षणासाठी प्रभावी कायदा करण्याची मागणी करू शकतात.
मंदिरांवरील आक्रमणास मूर्तीपूजेला विरोध आणि जिहादी विचारसरणी कारणीभूत !
मूर्तीपूजेला विरोध आणि जिहादी विचारसरणी यांमुळे मंदिरांवर आक्रमण होत आहेत. महंमद बिन कासीम याने पहिल्यांदा मंदिरावर आक्रमण केले. त्या वेळेपासून मंदिरांवर जिहादी आक्रमण होत आहे. जे मूर्तीपूजेच्या विरोधात आहेत, ते मंदिरात घुसू पहात आहेत. जर तुम्ही मूर्तीपूजेच्या विरोधात आहात, तर तुम्ही मंदिरात का येऊ इच्छिता ? सर्वप्रथम आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माचा स्वीकार करा आणि त्यानंतर मंदिरात या. असे केल्यास कुणालाच कोणताही आक्षेप नाही.
चर्चासत्रात सहभागी मान्यवरांनी सर्वत्रच्या हिंदूंना केलेले आवाहन !यति मा चेतनानंद सरस्वती – एक वेळ आम्ही आमचे प्राण देऊ; पण आमच्या देवतांच्या मूर्ती आणि प्रतिमा यांचे रक्षण करू. मंदिरांवर जिहादी आक्रमण हे केवळ डासना येथील धर्मपीठाची समस्या नाही, तर अन्यत्रच्या मंदिरांवरही हेच संकट आहे. सर्वत्रच्या हिंदूंना माझे आवाहन आहे की, धर्मपीठ आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी डासनादेवी मंदिर परिवारातील प्रत्येक जण समर्पित आहेच; परंतु तुम्हीही ठरवा की मंदिरांवर आक्रमण होऊ द्यायचे कि संघटित होऊन ते रोखायचे ? आपण सर्व एकत्र झालो, तरच हिंदु धर्म टिकू शकेल ! अधिवक्ता विष्णु शंकर जैन – कायदा आणि सुव्यवस्था हे संपूर्णत: राज्य सरकारचे दायित्व असले, तरी काही विशेष घटनांमध्ये कायदे करण्याचा केंद्र सरकारलाही अधिकार आहे. सध्या वैष्णोदेवी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर यांसारख्या मंदिरांमध्ये विशेष कायदे आहेत. वेगवेगळ्या मंदिरांसाठी वेगवेगळे कायदे करण्यापेक्षा मंदिरांच्या रक्षणासाठी सामाईक कायदा केला जावा. मंदिरांच्या पुजार्यांनी स्थानिक प्रशासनाला मंदिरांच्या रक्षणासाठी कायदा-सुव्यवस्था राखण्याविषयी निवेदन द्यायला हवे. विलंबाने मिळालेला न्याय, हा न्याय नसतो. त्यामुळे योग्य वेळेत राज्य सरकारने मंदिर रक्षणासाठी पावले उचलायला हवीत. कु. कृतिका खत्री – मंदिरांमध्ये कोण आणि का प्रवेश करत आहे ? हे पहाण्याची आज आवश्यकता आहे. श्रद्धावान आणि हिंदू यांनीच मंदिरात प्रवेश करावा, हे आपल्या सर्वांचे दायित्व आहे. मंदिरांच्या रक्षणाचे दायित्व विश्वस्तांचे आणि तेवढेच आपलेही आहे. मंदिरांवर आक्रमण होण्याची घटना आपल्या परिसरात घडल्यास हिंदूंनी एकत्र येऊन वैध मार्गाने त्याचा विरोध करायला हवा. स्थानिक प्रशासनाला निवेदन द्यायला हवे. मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ‘मंदिर संस्कृती रक्षण अभियान’ चालवले जात आहे. यात हिंदूंनी सहभागी व्हावे ! |